ह.भ.प. डॉ. दादा महाराज मनमाडकर हे वारकरी सांप्रदायाचे पहिले विद्यावाचस्पती व महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय पातळीवरील ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे पहिले मानकरी. हा गौरव प.पू. बालदास महाराजांच्या कृपाशिर्वादाने व माता-पित्याच्या पुण्याईने मिळाला अशी श्रद्धा मनमाडकर महाराजांची होती.
सन १९७० – ७१ साली योगीराज प. पू. बालदास महाराजांनी मनमाडकर महाराज यांना निरोप पाठविला व सांगितले की “यापुढे मठातून कोणीही माणूस आला तरी आपण किर्तन सेवेसाठी उपस्थित रहावे.” मनमाडकर महाराजांनी हे वचन त्यांच्या मृत्यूपर्यंत निष्ठेने पाळले व अखंडीत किर्तन सेवा अखेरपर्यंत पूर्ण केली.
ह.भ. प. डॉ. दादा महाराज मनमाडकर हे दि. २.०८.२०१३ रोजी (एकादशी) वैकुंठवासी झाले. त्यांची उणीव आम्हा सर्व बालदास भक्तांना भासणारच आहे. डॉ. दादा महाराज यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. अशी विनंती परमेश्वरचरणी व बालदास चरणी करीत आहोत.
|| जय योगीराज ||
Leave a Reply