उपाशी भक्तांची जाणीव झाली महाराजांनी वांगी घेतली

महाराजांच्या समवेत शिरगावचे रामचंद्र पाटील व शाळेची चारपाच मुले शिरगावहून सौत्याकडे निघाली होती. सौत्याचा मठ कुलुप घालून बंद होता. त्या मठात झाटलोट करण्यासाठी महाराज यायला लागले होते वाटेत महाराज मुलांना म्हणाले, “ अरे बाळांनो, शेतकऱ्याच्या शेतातली सात – आठ वांगी घ्या.”

हे ऐकून रामचंद्र पाटील म्हणाले,” महाराज मी जेऊन आलोय. मुलेही जेवून आलीत. वांगी कशाला घ्यायची?”

“अरे बाबा, मठात लोक येऊन उपाशी बसलेत. त्यांची सोय कोण करणार? राम तुला येवढं समजत नाही का?

“कोण तुम्हाला म्हणालं?”

“अरे बाबा कुणी सांगायला कशाला हवं. मला समद कळतय की.”

सर्वजण मठाकडे आले. तर मठाच्या पडवीला चार- पाच लांब गावचे लोक येऊन थांबले होते. महाराजांनी मठाचे कुलुप काढले. महाराज आत जाताच त्यांनी पटापटा दर्शन घेतले. महाराजांनी चहा केला. त्यांना दिला.,

“जेवणाचे कसे?”

“आम्ही उपाशी आहोत.”

रामचंद्र पाटलांना महाराज म्हणाले. “राम, वांगी कशाला घेता म्हणत होतास न! हे बघ त्याचं कारण.”

रामचंद्र पाटलांच्या लक्षात आलं की महाराज सर्वकाही जाणत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.