शिरगाव येथे रामचंद्र कृष्णा पाटलांच्या घराच्या पाडवीला महाराजांच्यासाठी खोली बांधली आहे. या खोलीत महाराज अग्नी पेटवून त्याला शेकत असत. एकदा धुनीला शेकुन महाराज पाठीमागे परसात बसायला गेले. परसात उंचवटयावर बसले. त्यावेळी एक प्रचंड नाग परसात महाराजांना दिसला. बघता बघता तो नाग महाराजांच्याकडे येऊ लागला. महाराजांच्या पायाजवळ आला. महाराजांनी त्यावर जमिनीची चिमटभर माती उचलून टाकली. नाग माती टाकताच फणा काढुन फुसss फुस्ss आवाज करीत निघून गेला.
महाराज म्हणाले, “बाबा दुसऱ्याला अशी भीती घालू नये. जा तुझे तू काम बघ जा.”
Leave a Reply