एकदा पंचवीस – तीस भक्तांचा समुदाय शिरगाव गावातून महाराजांच्याकडे गेला. महाराज तेव्हा सौते गावच्या मठात होते. महाराजांनी छोटयाशा पात्याल्यात चहा ठेवला. सात – आठ कपांचे ते पात्याले असले. तेवढया पात्यालातील चहा महाराजांनी वीस – पंचवीस भक्तांना पुरविला. सर्वजण कप आणि बशी भरुन चहा प्यालेत. चहा पिऊन झाल्यानंतर सगळे महाराजांच्याकडे बघू लागले. सर्वांना चहा देऊन झाल्यानंतर महाराज म्हणाले,
“अरे बाबांनो यात आश्चर्य कसलं? तुमच्यासाठी चहा वाढवला असणार ! देव भक्तांचा भुकेला असतो.”
Leave a Reply