परमेश्वर भक्‍ती मनाला शांती देते

एकदा कृष्णाबाई नावाची माय महाराजांच्याजवळ खडी साखरेचा प्रसाद मागण्यास गेली महाराज म्हणाले, “आज उठल्या उठल्या प्रसादाची तुला कशी काय आठवण झाली?

त्यावर कृष्णबाई म्हणाली, “महाराज महिनाभर मनाची शांतताच नाहीशी झालीया. कुठंही मन रमेनासं झालंया. राती तुम्ही स्वप्नात येऊन प्रसाद नेण्यास सांगितला म्हणून उठल्याबरोबर आंघोळ करुन आपल्याकडं बिगीबिगी धावत आलिया.”

महाराज म्हणाले, “माणसांन कुठं ना कुठं आपल मन दररोज एकचित्त करणं गरजेचं असतं असं केलं की मनाला शांतता मिळते. मनातील सगळीच धावपळ थांबते. तू मठात यायची विसरलीस, भक्‍तीकडं पाठ फिरवलीस म्हणून हा त्रास झाला. दररोज मठात येऊन देवाची आठवण करुन मनाला शांतता घेऊन जात जा.”

कृष्णाबाईनं महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे काही दिवस केले. तिच्या चित्ताला शांतता प्राप्त झाली. ती आनंदाने संसारात रमून गेली.

Leave a Reply

Your email address will not be published.