एकदा एक भक्त महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना म्हणाला “मी एक शंका विचारु का महाराज?” महाराज म्हणाले, “तुला काय विचारायचे ते खुशाल विचार.”
त्यानंतर त्या भक्ताने विचारले
“महाराज मूर्ती पुजेत काही अर्थ नाही असे एकाने मला सांगितले” यावर महाराज उत्तरले, “तुला ज्याने मूर्ती पुजा करण्यात काही अर्थ नाही असे सांगितले त्याचे मडके कच्चे वाटते. त्याचा स्वानुभव फारच कमी वाटतो. त्याला आपला धर्म कळलाच नाही असं वाटतं. अनंत काळापासून आपणाकडे मूर्तीची पूजा चालत आली आहे. या मूर्तीच्या उपासनेपासूनच अनेक लोक पूर्णत्वाकडे पोचले आहेत. मी जे सांगतो त्यावर पूर्ण विश्वास ठेव. याबाबत कुणाबरोबरही वादावादी करीत बसू नकोस”
Leave a Reply