एकदा एक देखणी स्त्री नटून थटून महराजांच्या दर्शनासाठी आली. तिनं डोळयात काजळ भरलं होतं. भुवया व पापण्या काळया काजळांनं लांबपर्यंत कोरल्या होत्या. कानात कर्णफुले होती. ओठाला लाली लावली होती. तोंडावर पावडरीचा लेप दिला होता. टेरीकॉटची डिझाईन असाणारी साडी परिधान केली होती आणि पायात छुमछुम वाजणारे पैंजन घातले होते. अशा अलंकाराने अलंकृत झालेल्या स्त्रीला महाराजम्हणाले,
“माय, तुम्ही तुमचा देह किती नटवलासा तरी शेवटी त्याची मातीच होणार आहे मग तुम्ही तुमच्या सौदर्याचं बाह्य औडंबर का करता? “माती असशी मातीत मिळशी” हे तुमच्या ध्यानात अजून कधी आलंच नाही काय ?”
हे महाराजांचे परखड शब्द ऐकून ती स्त्री म्हणाली, “मला माफ करा महाराज. येथून पुढे मी देहाला असा नटवणार नाही. आपलं बोल लक्षात आले.”
Leave a Reply