महाराजांचे ऐकले असते तर बरे झाले असते

त्या काळी महाराज सावर्डेकर गणपती पाटील यांच्या छपरात रहात होते. इतर सर्व भक्‍ता प्रमाणेच श्री दगडू पाटील हे सुद्धा जास्तीत जास्त वेळ महाराजांचे सेवेत असत. दिवस शेतीच्या मशागतीचे होते. दुपारच्या वेळी दगडू पाटील महाराजांना म्हणाले, घरचे इतर लोक शेतात गेले आहेत मलाही गेले पाहिजे. महाराजांनी त्यांना अनेक प्रकारे थांबवून घेण्याचा प्रयत्न केला पण दगडू पाटील म्हणू लागले महाराज मशागतीचे अखेरचे दिवस आहेत. घरातील लोक माझ्यावर रागवतील मला गेले पाहिजे व असे म्हणुन ते चालू लागले. महाराज म्हणाले अरे चहा तरी पिऊन जा व चहा देण्यास महाराजांनी बराच वेळ लावला दगडू पाटलांची चुळबुळ वाढू लागली त्यांनी कसाबसा चहा तेवढा घेतला व म्हणाले महाराज चलतो आता. महाराज म्हणाले आज शेताकडे नाही गेले तर चालणार नाही का ? दगडू पाटील म्हणाले “महाराज मला गेलेच पाहिजे” त्यानंतर महाराज म्हणाले जायालाच पाहिजे म्हणतोस तर मग जा बाबा. मी तरी काय करु व नंतर स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले ,“जातीला सगळं उलगडून सांगावे लागते तरच कळते.”

दगडू पाटील शेतात गेले तर त्यांच्या विरोधकाने त्यांच्या शेताचा बांध फोडला होता व त्यामुळे त्यांच्यात व विरोधकात तुंबळ मारामारी झाली.

सर्व झाल्यानंतर दगडू पाटलांचे लक्षात आले की महाराज जाऊ नको का म्हणत होते.

महाराजांना भविष्यातील घडणाऱ्या घटना कळत होत्या पण ते अप्रत्यक्षपणे त्यांची जाणीव भक्तास करुन देत असत.

Leave a Reply

Your email address will not be published.