एकदा एक शिक्षक महाराजांच्याकडे आले आणि म्हणाले “महाराज, माझा मुलगा चांगला शिकावा म्हणून मी त्याला कोल्हापूरात ठेवले आहे, पण तो अभ्यासच करीत नाही. तो दोनदा मॅट्रीकला नापास झाला आहे. तरी मी काय करु सांगा?”
यावर महाराज उत्तरले, “तू त्याला तुझ्याजवळच का ठेवले नाहीस? तुझ्या गावात हायस्कूल असताना तू त्याला दुसरीकडं का पाठवलंस? तूच हायस्कूलमध्ये शिक्षक आहेस न्हवं?
“होय मी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करीत असतानाही मी माझा मुलगा दुसरीकडे शिकण्यास पाठविला. कारण मुलगा चांगला तयार व्हावा हीच माझी अपेक्षा होती.”
यावर महाराज म्हणाले, “याचा अर्थ असा की, तू ज्या हायस्कुलमध्ये काम करतोयस त्या हायस्कुलवर तुझी श्रद्धा नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या शिकविण्यावर तुझा विश्वास नाही असंच न्हवं? मुलगा तुझ्या हाताखाली चांगला तयार होईल तसा दुसरीकडे होणार नाही.”
त्या शिक्षकाला आपली चूक ध्यानात आली तो तेथून गुमान निघून गेला.
Leave a Reply