घार फिरे आकाशी चित्त तिचे बाळापाशी

महाराज एकदा मुंबईस गेले होते. ते तेथे एक महिनाभर राहिले. एका भक्‍तानं त्यांना आपली स्वतंत्र खोली राहण्यासाठी दिली होती. महाराज त्या खोलीत ज्ञानेश्‍वरी अभंगगाथा या सारख्या ग्रंथांचे वाचन करीत बसत असत.

संध्याकाळी ८ वाजता मुंबईतील सर्व भक्‍त त्यांना भेटण्यासाठी येत. महाराजांच्या बरोबर अध्यात्मिक व समाजकल्याणाच्या चर्चा करीत बसत. महाराज मध्येच बोलता बोलता विचारत,

अरे दगडू पाटील काय बरेच दिवस आला नाही. कापशीचा तानाजी कधी येणार? शिवंचा दरा ऊकरायचा चालला होता त्याचं काय झालं? यंदा मात्र बाळू पाटलाला पंढरीच्या वारीला घेऊन जायचं बरं का? गेल्या वर्षी पंढरीच्या वारीला बाळू पाटील आला नाही, त्याला म्हणावं विठ्ठलाला विसरुन चालल कसं बाबा? तब्बेत बरी नाही म्हणून चालणार नाही. मानसांत मिसळून चालायला लागलं की विठ्ठलही बरोबर चालत असतो. मग दुखनं कुंठ राहील तुझं म्हणावं? राम खोपडे मुंबईला आला आणि लगेच गेला. उगीच राजकारणी माणसांच्या नादाला लागतुया. आरं बाबा, दिसतं तसं नसतं म्हणून तर सारं जग फसतयं.”

महाराज महिनाभर मुंबईत राहिले, पण सारं लक्ष त्यांचं भक्‍ताच्याकडे असायचं.

“घार फिरे आकाशी, चित्त तिचे बाळापाशी”

अशीच महाराजांची अवस्था असायची.”

Leave a Reply

Your email address will not be published.