सौते गावात महाराजांची भक्ती करणारी एक भक्तीण होती. ती महिनाभर आजारी पडली आणि एके दिवशी अचानक सायंकाळी मरण पावली. तिचं प्रेत महाराजांच्या मठासमोरुन घेऊन लोक गेले. महाराजांना जवळ बसलेल्या भक्तांनी ही बातमी सांगितली. महाराजांनी त्या प्रेतयात्रेतेल एका मुलास बोलावून घेतले. महाराजांनी त्या मुलाच्या हातात काहीतरी वस्तू दिली आणि स्मशानभूमीत जाताच त्याने ती मुठ उघडली. परिणाम असा की ते प्रेत जागे झाले. ती भक्त स्त्री परत एक दिवस अधिक जगली नंतर मात्र ती मरण पावली.
Leave a Reply