भक्ताला न्याय मिळाला

सावर्डे गावचे एक भक्त श्री. दादु दौलु पाटील राजेश मिल मध्ये नोकरीस होते. काही लोकांनी कट करुन त्यांच्यावर चोरीचा आरोप घातला त्यांना नोकरीतून तात्पुरते कमी करुन चौकशी लावण्यात आली. घरी येऊन दादु पाटील चिंताक्रांत चेहऱ्याने बसले असता दारात एक साधू येऊन उभा राहिला. चिंतातूर चेहरा पाहून साधूने काय घडले म्हणून विचारले असता पाया पडून दादुने सर्व वृत्तांत कथन केला. त्या साधूने दादूस एक फुल दिले व तीन दिवसांत तुझा न्याय होईल असे सांगितले. त्यानंतर चौकशी होऊन दादु निर्दोष ठरला व नोकरीवर रुजू झाला आणि ज्याने कारस्थान केले होते त्याला विविध कारणाने शिक्षा झाली.

दादु पाटील हा महाराजांचा एकनिष्ठ भक्‍त आहे. महाराजांचे नाव सतत त्यांच्या स्मरणात असते. वरील प्रमाणेचा मिळालेला न्याय हि महाराजांचीच कृपा आहे असे दादुचे ठाम म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.