धन्य धन्य बालदास महाराज, प्रणाम तुमच्या पायी हो |
सुखे निद्रा घ्यावी योगीराज, विनंती जोडूनी करा हो ||
आम्ही पामरे कष्टविले तुझ, दिनभर स्वार्थासाठी हो |
देहबुद्धीने मागितले तुज, संसारातील सुखा हो ||
देणारा तु उदार स्वामी, त्रैल्योक्याचा राणा हो |
जन्मभरीचे भिकारी आम्ही, झोळी आमची रिती हो ||
सदा मागणी केलीदेवा, अनंत परिच्या सुखा हो |
दिलेस देवा अनंत हस्ते, अतृप्ती तरी मनी हो ||
तुझ्या रुपाने दारी आमच्या, कल्पवृक्ष उगवला हो |
ईश्वर प्राप्ती शिवाय देवा, दान अन्य इच्छिले हो ||
अपराधाची क्षमा असावी, दिनदयाळा देवा हो |
मुढमती कष्टविले बहु, क्षमा याचना करतो हो ||
सूखें निद्रा करा आतां, करुणाकर यतीवरा हो |
पायी ठेवूनी मस्तक देवा, प्रेमानंद विनवी हो ||
प्रेमानंद विनवी हो || प्रेमानंद विनवी हो ||
– कै. प्रेमानंद मयेकर (मुंबई)