अनुभव

गाढवाचा आत्मा जाणला

रामचंद्र पाटील व काही मुले शिरगावहून सौत्याला चालत येत होती. वाटेला गाढवांचा कळप आढळला. त्यांच्या पाठीवर बेलदारांनी दगडे ठेवली होती. ते दगड वाहून नेण्याचे काम ती गाढवे करीत होती. त्या काळपात एक पाय मोडके लंगडे गाढव होते. ते लंगडे असुन त्याच्या पाठीवर बेलदाराने मारुन मारुन […]

Read More

पांढर्‍या खड्यानं पाणी दिलं, पाण्यानं पोट भरुन गेलं

रामचंद्र पाटील (शिरगाव) हे मलकापूरला हायस्कूलमध्ये शिकत होते. एप्रिल महिना होता. सकाळी शाळा भरे व बारा वाजता सुटे. शाळेतून बाहेर पडायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला रस्त्यानं मलकापूरकडून शिरगावाकडे यायला निघाले. ऊन मी म्हणत होते. वाटेला तहान खूप लागली. रामचंद्र पाटलांच्या तोंडाला कोरड पडली, त्यांना […]

Read More

सापाने आज्ञापालन केले

शिरगाव येथे रामचंद्र कृष्णा पाटलांच्या घराच्या पाडवीला महाराजांच्यासाठी खोली बांधली आहे. या खोलीत महाराज अग्नी पेटवून त्याला शेकत असत. एकदा धुनीला शेकुन महाराज पाठीमागे परसात बसायला गेले. परसात उंचवटयावर बसले. त्यावेळी एक प्रचंड नाग परसात महाराजांना दिसला. बघता बघता तो नाग महाराजांच्याकडे येऊ लागला. महाराजांच्या […]

Read More

आभाळायेवढा आशीर्वाद

महाराज हे रामचंद्र पाटील यांच्या वडिलांच्या मावशीचे सुपुत्र. रामचंद्र पाटलांची आजी ममताई ही महाराजांची मावशी. महाराज लहानपणी रामचंद्र पाटलांच्या घरी येत. पण घरात कधी येत नसत. बाहेरच ते ओटीवर बसत. रामचंद्र पाटलांची आजी महाराजांना बाळू म्हणत असे. बाळू घराकडे आला की ममताई (रामचंद्र पाटलांची आजी […]

Read More

चांगले संस्कार आयुष्याचं सोनं करतात

महाराज सौते गावच्या मठात असताना त्यांच्याकडे सहासात मांजरे होती. सगळ्या मांजरांची त्यांनी नावे ठेवली होती. ज्या मांजराचे महाराज नाव घेत ते मांजर त्यांच्याजवळ लाडकत येत असे. मनी आणि सुंदरी ही दोन मांजरे महाराजांना जास्त प्रिय होती. एक कुत्रे ही महाराजांनी मठात पाळले होते. त्यांचे नाव […]

Read More

दैवी शक्तिचा प्रत्यय

एकदा महाराज सौते गावचे बुरसे यांचे कडे गाईंना वैरण मागण्यासाठी गेले असता बुरसे यांनी “तुला उचललं तेवढ घेऊन जा” असे महाराजांना सांगितले. महाराजांनी स्वत:च पिंजराची संपूर्ण गंजी बांधली व उचलून घेऊन गेले. बुरसे बघतच राहिले. तसाच प्रकार नामदेव चोपडे सावर्डेकर यांचे बाबतीत घडला. गाईना कडबा […]

Read More

महाराजांचे कृपेने असाध्य रोग बरा झाला

महाराजांचे एक सद्‌भक्त श्री दादू दौलू पाटील त्यावेळी मुंबईत राजेश मिलमध्ये नोकरीस होते. महाराज ज्या वेळी मुंबईत येत किंवा ज्या वेळी महाराजांच्या गावी हरीनाम सप्ताह असे त्यावेळी दादू पाटील नेहमी राजेश मिलचे सुपरवायझर यांचे कडे रजेसाठी अर्ज घेऊन जात असत. एकदा असेच महाराज मुंबईस आले […]

Read More

महाराजांचे ऐकले असते तर बरे झाले असते

त्या काळी महाराज सावर्डेकर गणपती पाटील यांच्या छपरात रहात होते. इतर सर्व भक्‍ता प्रमाणेच श्री दगडू पाटील हे सुद्धा जास्तीत जास्त वेळ महाराजांचे सेवेत असत. दिवस शेतीच्या मशागतीचे होते. दुपारच्या वेळी दगडू पाटील महाराजांना म्हणाले, घरचे इतर लोक शेतात गेले आहेत मलाही गेले पाहिजे. महाराजांनी […]

Read More

आडाला पाणी लागले

शाहूवाडी तालुक्‍यातील शिरगांव गाव हे मोजकीच लोकसंख्या असलेले १२ बलुतेदारांच्या १२ गल्ल्यांनी वसलेले गाव. लांबलचक सरळ रस्ते, एका रांगेत लहान-मोठी घरे आणि १२ गल्ल्यांच्या मधोमध श्री निनाई देवीचे मंदिर. गावाच्या सभोवताली काळी कसदार सुपिक जमिन. पावसाळयात आणि हिवाळयात या जमिनीचा थाट काही औरच असतो. अनेक […]

Read More