अनुभव

ताराची म्हैस आडली, तारा घळाघळा रडली

गाडयाच्या वाडीची ताराबाई नावाची एक महाराजांची भक्‍तीन होती. ती वर्षातून सवडीनुसार तीन चार वेळा सौत्याच्या मठाकडे भक्तीभावाने यायची. येताना महाराजाच्या मठात तुपाची वात काही दिवस लागावी म्हणून ती घरात साठलेलं तूप घेऊन यायची उदबत्तीचा मोठयात मोठा चांगला सुवासिक वासाचा पुडा घेऊन यायला विसरायची नाही. खडीसाखर, […]

Read More

शुद्ध भक्‍तीपोटी असती, फळे रसाळ गोमटी

एकदा माझे वडिल आणि महाराज हे दोघे सौते मठातून चालत बांबवडेपर्यंत आले. बांबडयातून ते एका मालवाहतुक ट्रकातून कोल्हापूरात पंचगंगा नदीवर उतरले. पंचगंगा नदीच्या घाटावर महाराजांनी थोडावेळ जप व कुठल्यातरी ग्रंथाचे वाचन केले. नंतर दोघेजण चालत चालत कुंभार गल्लीच्या दत्तमंदिराकडे आले. येताना माझ्या वडिलांना महाराज म्हणाले, […]

Read More

महाराजांच्या तोंडुन आले, करवंदाने भविष्य केले, ते ते सर्व घडत गेले

महाराज बांदयांच्या जंगलात जनावरं घेऊन चारायला जात. जनावरं चरत असताना महाराज ग्रंथ वाचनाचे आणि पाठांतराचे काम करीत असत. काहीवेळा विरंगुळा म्हणून ते करवंदाच्या जाळीजवळ जाऊन करवंदे तोडत व पळसाच्या पानांचा द्रोण करुन त्यात साठवत. द्रोण भरला की तो द्रोण ते पळसाच्या पानांनी तयार केलेल्या इस्तारीवर […]

Read More

दु:स्वी हौसा सुखी झाली, जीव घेऊन घरी आली

सौते गावच्या शेजारील गावची एक हौसा नावाची बाई कडवी नदीत जीव देण्यासाठी निघली. जाता जाता तिला महाराजांचे दर्शन घेऊन आपले जीवन संपवावे असे वाटले. ती नदीवरुन थेट सौते गावच्या महाराजांच्या मठात आली तर महाराज गवत कापण्यासाठी बाद्याच्या जंगलात गेलेत असे समजले. ती पायवाटेने तिकडे निघाली […]

Read More

डोंगरातल्या वाटा ज्ञानानं फुलू देत

कोपर्डेचा एक मुंबईवाला भक्‍त महाराजांना भेटण्यासाठी आला. तो मठाला सकाळी ८ वाजता आला. तर महाराज होते बहिरीच्या पठारावर बहिरीच्या देवळाजवळ बसले होते. हातात दासबोध होता. खाद्यावर पांढऱ्या शुभ्र धोतराचा शेव टाकला होता. नजर ग्रंथावर खिळली होती. अशा अवस्थेत महाराज असताना तो मुंबईवाला तेथे पोचला. जवळ […]

Read More

साक्षात महाराज अवतरले, पंढरीचे वारकरी वेळेत उठले

श्री क्षेत्र शिरगाव येथे, प. पू. बालदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळयासाठी दरवर्षीप्रमाणे ह.भ.प. दादा महाराज मनमाडकर व त्यांचे भजनी मंडळातील साथीदार आले होते. सर्व पंढरीचे वारकरी समाधी जवळच असलेल्या एका जनावरांच्या गोठयात झोपले होते. भजनी मंडळातील वैकुंठवाशी प. पू. नागनाथ महाराज माहूरगडकर आणि श्री. ह. भ. […]

Read More

चिमण्या शेत खाऊन गेल्या

लहर येईल तेव्हा महाराज नृसिंहवाडीला जात. एकदा महाराज पहाटे तीन वाजता उठले आणि प्रातःविधी आटोपून बांबवडयाला चालत आले. साडेचारच्या सुमारास त्यांनी एका भक्तांच्या दारात उभे राहून त्याला हाक दिली. तो पळतच बाहेर आला. त्याला म्हणाले, “भिवा , चल आटप.” “कुठे ?” “वाडीला जायचं.” “आज अचानक […]

Read More

उपाशी भक्तांची जाणीव झाली महाराजांनी वांगी घेतली

महाराजांच्या समवेत शिरगावचे रामचंद्र पाटील व शाळेची चारपाच मुले शिरगावहून सौत्याकडे निघाली होती. सौत्याचा मठ कुलुप घालून बंद होता. त्या मठात झाटलोट करण्यासाठी महाराज यायला लागले होते वाटेत महाराज मुलांना म्हणाले, “ अरे बाळांनो, शेतकऱ्याच्या शेतातली सात – आठ वांगी घ्या.” हे ऐकून रामचंद्र पाटील […]

Read More

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले

रामचंद्र पाटील एकदा महाराजांचे समवेत मठात बोलत बसले होते. अशा वेळी मठात एक संन्याशी आला. त्याच्या अंगावर भगवी वस्त्रे होती पण ती जीर्ण झाली होती. पार फाटली होती. महाराजांनी ही त्या संन्याशाची अवस्था बघताच त्यांनी त्याचे मनोगत जाणले आणि आपल्या अंगातील नवीन धोतर फाडून त्यातील […]

Read More