अनुभव

पत्रावळयांच्या गठ्यांचे कोडे सुटता सुटना

काही वेळा जनावरे चारताना महाराज पळसांच्या पानांच्या पत्रावळया तयार करीत. बरोबर असलेल्या इतर गुरख्यांनाही ते पत्रावळया तयार करायला शिकवत. तयार झालेल्या पत्रावळयांचे ते बांधण्याने गठ्ठे बांधत. संध्याकाळी घरी येताना प्रत्येकजण एक एक गठ्ठा डोक्यावर घेऊन येत. घरात आणलेला गठ्ठा प्रत्येकजण गठ्ठुयावर गठ्ठा असे रचून ठेवत. […]

Read More

महाराज आमुचा पाठीराखा

महाराजांचा कऱ्हाडचा एक भक्त मुंबईत राहात होता. मुंबईत त्याची स्वतःची एक खोली होती. वीस बाय वीसाच्या खोलीत त्याचा संसार मांडलेला होता. त्यातच बायको, मुले असा त्याचा गोतावळा झोपत होता. मुले किती ? ११ मुले त्याला होती. पाच मुली व सहा मुलगे होते दोघांची लग्ने झाली […]

Read More

मीठाची साखर झाली चहाची तलप गेली

एकदा काय झालं एक अनोळखी मीठवाला मीठ विकण्यासाठी सौते गावात आला. मीठ विकताना तो पायलीभर मीठाच्या बदल्यात पायलीभर भात घ्यायचा. तो मठाजवळ येताच त्यानं हाक दिली. “मीठ घ्या s मीठ घ्या हो ss.” महाराज मठातून बाहेर आले आणिम्हणाले “एक पायली मीठ घालतोस का?” “हो घालतो […]

Read More

महाराजांचा कृपाप्रसाद मिळाला तो जगी धन्य झाला

महाराजांचा कृपाप्रसाद ज्या भक्तांना मिळाला ते जीवनात धन्य झाले. जे रंजले गांजले होते त्यांना सुखाचे दिवस आले. ज्यांना महाभयानक आजरपिडा होती ती त्याची दूर झाली. कोर्टाच्या कामाचा ज्यांच्या गळयाला फास होता तो सुटला. ज्यांना बैल गाडी नव्हती त्यांना ती मिळालीत. ज्यांना अन्न नव्हते ते सुखाने […]

Read More

गरिबाची गरिबी गेली महाराजांची वाचा सोन्याची ठरली

रत्नागिरीतील पार्वती नावाची भक्‍तीन ठाण्याला राहात होती. वर्षातून एकदातरी ती सौत्याच्या मठात येऊन जायची. महाराज तिला पार्वती माता म्हणून बोलवायचे. पार्वतीनं त्या काळात म्हणजे सन १९५८ च्या दरम्यान ठाण्यात चार पाच गुंठे जमिन घेतली. जमिन मुरमाड होती. तिला ती जमीन फक्त दोन हजारात मिळाली होती. […]

Read More

मदनचा पाय मोडला महाराजांनी वैद्य आणला

महाराज चाळीस जनावरांचा कळप घेऊन जंगलात चारायला जात. दिवसभर जनावरांच्या पाठीमागे उभे राहात. संध्याकाळी गावाकडे परतत. डोंगरातून तिन्ही सांजेला जनावरे उतरताना फार काळजीपूर्वक उतरावी लागत. डोंगरातील पाऊल वाटेने एक एक करत जनावर उतरावं लागतं, गडबड करुन चालत नाही. नाहीतर मग कुणीतरी कोलांट्या उडया खात गडगड […]

Read More

महाराजांना ठेच लागली नागाने धाव घेतली

बालदास महाराज बाद्याच्या जंगलातून गाई बैलांचा कळप घेऊन सौते गावाकडे येत होते. येताना वाटेत महाराजांना ठेच लागली अंगठा फुटला. महाराज लगेच कुडकुडीचा पाला इकडे तिकडे बघायला लागले. त्यांना कुडकुडीचा पाला मिळाला. तो हातावर चोळून त्यातून त्यांनी रस काढला आणि तो रस व चुरडलेला पाला त्यांनी […]

Read More

घार फिरे आकाशी चित्त तिचे बाळापाशी

महाराज एकदा मुंबईस गेले होते. ते तेथे एक महिनाभर राहिले. एका भक्‍तानं त्यांना आपली स्वतंत्र खोली राहण्यासाठी दिली होती. महाराज त्या खोलीत ज्ञानेश्‍वरी अभंगगाथा या सारख्या ग्रंथांचे वाचन करीत बसत असत. संध्याकाळी ८ वाजता मुंबईतील सर्व भक्‍त त्यांना भेटण्यासाठी येत. महाराजांच्या बरोबर अध्यात्मिक व समाजकल्याणाच्या […]

Read More

झोळीत भात शिजविला

एकदा शिरगावचे बापू महाराज व बालदास महाराज हे दोघेजन कापशीहून सौत्याच्या मठाकडे येत होते. येताना वाटेतच बापू महाराज महाराजांना म्हणाले, “महाराज, मला भूक लागली आहे. मला चालवेनासे झाले आहे.” बालदास महाराज म्हणाले, “बाटलीतील पाणी पी, म्हणजे तुला तरतरीपणा येईल. का उगीचच नाटक करायला लागलास. खुळया […]

Read More