महाराजांनी परातभर पाला खाल्ला
महाराज काटेकुळशींद्याचा पाला शिजवून खात असत. एकदा एका भक्तानं परातभर तो पाला शिजवून नेला आणि महाराजांच्या समोर ठेवला. महाराज एवढा पाला खाणार नाहीत असे त्या भक्ताला वाटले. पण महाराजांनी तो सर्व पाला बकाबका खाऊन टाकला आणि म्हणाले “अरे भक्ता! पाला संपला काय ?” भक्त म्हणाला, […]
Read Moreपाटील आणि पवार वाद मिटविला
सावर्डे येथील पाटील गल्ली आणि पवार गल्ली यांचा दहा वर्षे पाणवठयाबाबत वाद चालला होता. कोर्ट कचेऱ्या झाल्या होत्या. पण महाराजांनी त्या दोन्ही पाटर्यांना बोलावून घेऊन समजावून सांगितले आणि दोन्ही गटांच्या लोकांनी ते ऐकले. महाराजांना आनंद वाटला. सारेजण महाराजांचे दर्शन घेऊन आपल्याआपल्या घरी गेले.
Read Moreजशी भावना तसे फळ
एकदा एक भक्त महाराजांच्या सेवेत गुंतल्यामुळे त्याच्या पेरणीस वेळ झाला. गावातील इतर लोकांनी भाताची पेरणी मे मध्येच धुळवाफेनं केली पण महाराजांच्या सेवेत संपूर्ण मे महिना गेल्यामुळे शेताची मशागत करण्यासाठी त्या भक्ताला वेळ अजिबात मिळाला नाही. जूनमध्ये शेतीची मशागत पहिल्याच आठवडयात त्या भक्ताने केली आणि दुसऱ्या […]
Read Moreरस्त्यात पडलेले प्रचंड झाड बाजूला सारले
सौत गावात हुंबराचे झाड रस्त्यात आडवे पडले होते. झाडाचा बुंदा तीन – चार गडयांच्या कवळयात मावणार नाही येवढा मोठा होता. गावातील बऱ्याच लोकांनी. झाड बाजूला ढकलून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही. सारा प्रकार महाराजाच्या कानावर गेला. महाराज मठातून ताडकन उठले आणि त्या […]
Read Moreमहाराज आंतर ज्ञानी होते
महाराजांच्या एका अर्धवट असलेल्या कीर्तनकार भक्तांन एका भाताच्या खळयावरील मालकाबरोबर महाराजांची टिंगलवजा चर्चा केली. ती चर्चा तो किर्तनकार करुन झाल्यानंतर महाराजांच्या मठात आला. त्यावेळी महाराज त्याला लगेच म्हणाले, “दुसऱ्याची टिंगल करुन तुम्हा लोकांना काय मिळतं?” तो किर्तनकार म्हणाला मी केलेली चूक आपणास कोण बोललं “महाराज […]
Read Moreपात्यालातील चहा देवाने वाढविला
एकदा पंचवीस – तीस भक्तांचा समुदाय शिरगाव गावातून महाराजांच्याकडे गेला. महाराज तेव्हा सौते गावच्या मठात होते. महाराजांनी छोटयाशा पात्याल्यात चहा ठेवला. सात – आठ कपांचे ते पात्याले असले. तेवढया पात्यालातील चहा महाराजांनी वीस – पंचवीस भक्तांना पुरविला. सर्वजण कप आणि बशी भरुन चहा प्यालेत. चहा […]
Read Moreमाथ्यावर कवार शिजली पण तूप वितळले नाही
एकदा महाराज आपल्या दोन भक्तांच्या बरोबर कोल्हापूरातून निघून सौत्याकडे येण्यास निघाले. पण भैरेवाडी येथे त्यांना खूपच रात्र झाली. त्यामुळे ते सर्वजण तेथील भैरोबाच्या देवळात थांबले. महाराजांचा माथा खूपच तप्त झाला होता. महाराज एका भक्ताला म्हणाले,“अरे दगडु पाटील त्या देवाच्या दिव्यातील तूप घेऊन माझ्या डोक्यावर घाल.” […]
Read Moreखडीसाखरेने ताप गेला
एकदा एका भक्त स्त्रीच्या मुलास चौदा दिवस ताप होता. त्या काळात डॉक्टरांची सोय खेडोपाडी नव्हती. चौदा दिवसानंतर ती स्त्री भक्त महाराजांच्याकडे गेली आणि, “काय करायचे ते करा पणमाझं पोरगं जगलं पाहिजे. चौदा दिवस झालं तापानं भाजून निघालया बघा.” महाराजांनी एका पुडीतनं खडीसाखर दिली. ती चार […]
Read Moreगुरुकृपेने नागाचे विष उतरले
एकदा महाराजांच्या सौते गावातील स्त्री भक्तास नाग चावला. नाग चावताच त्या स्त्रीला त्यावेळच्या रितीरीवाजाप्रमाणे देवाच्या देवळात ठेवण्यात आले. महाराजांना ही बातमी कळताच महाराज तिकडे आपणाहून धावले आणि त्यांनी आपल्या गुरुच्या चरणाजवळचा अंगारा त्या स्त्रीच्या अंगावर नेऊन टाकला. बेशुद्ध पडलेली ती स्त्री पहाटेची शुद्धीवर आली. महाराजांना […]
Read More