एकदा महाराज आपल्या दोन भक्तांच्या बरोबर कोल्हापूरातून निघून सौत्याकडे येण्यास निघाले. पण भैरेवाडी येथे त्यांना खूपच रात्र झाली. त्यामुळे ते सर्वजण तेथील भैरोबाच्या देवळात थांबले.
महाराजांचा माथा खूपच तप्त झाला होता. महाराज एका भक्ताला म्हणाले,“अरे दगडु पाटील त्या देवाच्या दिव्यातील तूप घेऊन माझ्या डोक्यावर घाल.” तसे दगडु पाटलांनी केले. पण तूपमात्र त्यांच्या डोक्यावर वितळले नाही. ते बघून दगडु पाटील म्हणाले,
“महाराज तुमच्या डोक्यावर कवार रट् रट् शिजते आणि तूप का पाघळत नाही ?”
त्यावर महाराज म्हणाले, “अरे बाबा, ते तू देवाला विचार मला कशाला विचारतोस ?”
Leave a Reply