महाराज हे रामचंद्र पाटील यांच्या वडिलांच्या मावशीचे सुपुत्र. रामचंद्र पाटलांची आजी ममताई ही महाराजांची मावशी. महाराज लहानपणी रामचंद्र पाटलांच्या घरी येत. पण घरात कधी येत नसत. बाहेरच ते ओटीवर बसत. रामचंद्र पाटलांची आजी महाराजांना बाळू म्हणत असे.
बाळू घराकडे आला की ममताई (रामचंद्र पाटलांची आजी ) बाळू येण्याचे कारण ओळखत असे. कारण बाळु घडी घडी घराकडे येत नसे. कारणाकारणीच येत असे बाळू आला की ममताई म्हणायची, “बाळु आलाय त्याअर्थी तो तीर्थयात्रेला निघाला असणार आहे. उगीच तो येणार नाही. त्याला पैसे इच्छेने दिले पाहिजेत. तसेच प्रवासात खाण्यासाठी गुळशेंगाही दिल्या पाहिजेत.”
ममताई दील ते पैसे आणि गूळशेंगा घेऊन बाळू जात असे. ममताईची बहिण जिजाबाई तिचा एकुलता एक मुलगा म्हणजे बाळू होय. बाळू कमीत कमी बोलत असे नम्रपणाने वागत असे. ममताई बाळूला एकदा म्हणाली बाळू तू तार्थक्षेत्राला निघालास चांगली गोष्ट आहे. पण तू परत येताना मला तीर्थक्षेत्रहून काय आणशील?
बाळू उत्तरला, “आजी तुला तीर्थक्षेत्राहून येताना मी देवाचा आभाळाएवढा आशीर्वाद आणीन.”
Leave a Reply