एकदा महाराज सौते गावचे बुरसे यांचे कडे गाईंना वैरण मागण्यासाठी गेले असता बुरसे यांनी “तुला उचललं तेवढ घेऊन जा” असे महाराजांना सांगितले. महाराजांनी स्वत:च पिंजराची संपूर्ण गंजी बांधली व उचलून घेऊन गेले. बुरसे बघतच राहिले. तसाच प्रकार नामदेव चोपडे सावर्डेकर यांचे बाबतीत घडला. गाईना कडबा मागण्यासाठी महाराज गेले. जमल तेवढ उचलून ने म्हणून सांगितले असता महाराजांनी कडब्याचे संपूर्ण बुचाड दोरीवर बांधून उचलून घेऊन गेले.
योगीराज प.पू. बालदास महाराज दरवर्षी आपले गुरु प.पू. कृष्णदास महाराज यांची पुण्यतिथी सौते मठात साजरी करीत असत. पुण्यतिथी उत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह ज्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, प्रवचन, कीर्तन हे दैनंदिन – कार्यक्रम होत असत त्यासाठी भव्य दुमजली भव्य मंडप उभारण्यात येत असे. एके वर्षी मंडपासाठी बांबु आणण्यासाठी एक बैलगाडी व चार भक्तांना कोतोली या गावी पाठविले होते. रात्र झाली तरी गाडी मठात आली नव्हती, रात्री महाराज उजेडासाठी कंदील घेऊन कापशी व सौतेच्या मधल्या डोंगरावर गेले असता बांबुनी भरलेली गाडी उलटी झालेली त्यांना दिसली. कोणालाही ती सरळ करता येत नव्हती. परंतू प.पू. महाराजांनी दोन्ही हातांनी एकटयाने ती ओल्या बांबूनी भरलेली बैलगाडी सरळ केली. केवढी ही अचाट शक्ती. महाराजांच्याकडे सर्व सामान्य माणसांपेक्षा कितीतरी पटीने अधीक शक्ती होती हे अनेक प्रसंगातून सिद्ध झाले आहे. यास दैवी शक्ती असेच म्हणावे लागेल.
Leave a Reply