एकदा काय झालं एक अनोळखी मीठवाला मीठ विकण्यासाठी सौते गावात आला. मीठ विकताना तो पायलीभर मीठाच्या बदल्यात पायलीभर भात घ्यायचा.
तो मठाजवळ येताच त्यानं हाक दिली. “मीठ घ्या s मीठ घ्या हो ss.”
महाराज मठातून बाहेर आले आणिम्हणाले “एक पायली मीठ घालतोस का?”
“हो घालतो पणत्या बदल्यात एक पायली भात पाहिजे मला.”
“नाही बाबा माझ्याकडे भात नाही. मी तुला पैसे देतो. किती द्यायचे बोल?”
“पाच रुपये द्या आणि बघा सकाळची वेळ हाय. मला कपभर चहा दिलासा तर फार उपकार होतील बघा.”
“तुला एकाला चार कप चहा दिला असता. पण माझ्याकडं आज साखर संपलीया.”
“मीदुकानातून आणून देतो.”
महाराज क्षणभर थांबले आणि त्याला म्हणाले “तुला खरंच चहाची लई तलप झालीया?”
“होय, महाराज.”
“मग तुझ्या मीठाच्या पोत्यातील दोन मुठी मीठ आन.”
त्याने मीठ घेतले आणि महाराजांकडे गेला.
महाराजांनी चहाच्या पात्यालात दो कप पाणी घेतले. त्यात दोन चमचे पूड टाकली आणि मीठवाल्याला म्हणाले या पात्यालात मीठ टाक. त्याने ते दोन मुठी मीठ चहाच्या पात्याल्यात टाकले आणिम्हणाला,
“महाराज, हे मीठ हाय साखर न्हाय.”
“अरे बाबा हे काय हाय आणि काय न्हाय ते तू मला सांगू नकोस मला सर्व माहीत हाय. तुला चहा मिळाल्याचं कारणं बाकी चौकशी करु नकोस.”
महाराजांनी चुलीवर चहाला उकळी आणली आणि कपात चहा वतला. आणि मीठवाल्याला म्हणाले,
“घे बाबा चहा घे. चहा फार गोड झाला असेल कारण तू दोन मुठी साखर टाकली आहेसन?”
“होय महाराज, साखर नव्हे मीठ दोन मुठी टाकलय.”
“खुळया मीठ नव्हे तू टाकलेली ती साखरचं होती. चहा पिऊन त्याचे उत्तर सांग.”
“होय महाराज चहा फारच गोड झालाय.”
“तुला चहां पिण्याची फार इच्छा झाली होती म्हणून देवाने तुझी सोय केली.”
“महाराज मीठाची साखर कशी झाली हे कोडं समजत नाही.”
“तुला हे कसं घडलं हे समजत नसेल तर त्याचे उत्तर देवालाच विचार.”
विचार करत करत मीठवाला महाराजांना पाहिजे असलेले पायलीभर मीठ आणायला गेला. तर सारे पोते साखरेचे झाले होते. ते साखरेचे पोते घेऊन तो मठात गेला. महाराजांना ते पोते त्याने दिले.
महाराज म्हणाले, “हे तू साऱ्यांना सांगू नकोस. नाही तर सगळीजन मीठाचं पोतं घेऊन येतील आणि मला साखरेचे पोते द्या म्हणतील. मी प्रत्येकाला कुठली साखर देऊ?”
Leave a Reply