एक भक्त महाराजांकडे आला आणि म्हणाला, “महाराज मी कलेक्टर कचेरीतील माझे काम करण्यासाठी वरेच हेलपाटे घालतोय तरी ते काम होत नाही. म्हणून पुढाऱ्याला सांगावे म्हणतोय. महाराज पटकन त्याला म्हणाले, अरे बाबा, कलेक्टर साहेबांकडे तुझं काम आणि पुढाऱ्याला काय सांगणार? तुझं काम तू एकाला चार हेलपाटे घालून करुन घे. तुझ्या कामाचे पुढाऱ्याला काय सुःख दुःख असणार? पुढारी सांगतो म्हणणार आणि सोडून देणार. अरे बाबा, कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. आपल्या कामाची किंमत आपणला माहित असते. दुसऱ्याला त्याचे काय? माणसाने नेहमी कामाची पाठ धरावी. कामाच्या पाठीवर राहणाऱ्याचेच काम वेळेवर होते. जो दुसऱ्यावर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतो. कार्य भाग बुडाल्यावर पश्चात्ताप करुन काय उपयोग आहे का? म्हणून जे काम तुझे आहे ते जातीनीशी तूच करुन घे.”
Leave a Reply