वर्षाची एकादशी होती. साऱ्या सौते गावातील विठ्ठलाचे भक्त पंढरपूरला निघाले. त्यांच्या मेळयात दर वर्षाला महाराज सामिल असायचे. पण चालू वर्षी आपली प्रकृती बरी नाही, त्यामुळे आपण पंढरीला या वारीला येणार नाही. असे महाराजांनी अगोदरच जाहीर करुन टाकले होते.
सौते, शिरगाव, मोळवडे… इत्यादी गावाचा भक्तगण महाराजांना सोडून पंढरपूरला गेला. पण गम्मत अशी की महाराज एकादशी दिवशी सौते मठातही होते आणि पंढरपुरातही होते. पंढरपूरला न गेलेले व सौतेगावात असणारे लोक नंतर पंढरपुरातून आलेल्या आपल्यागावाच्या भक्तांना सांगू लागले की महाराज पंढरपूरला न येता येथेच होते. आम्ही त्यांच्या समवेत येथे मठात भजन केले.
तर या उलट पंढरपुरातून आलेले भक्त असे सांगू लागले की महाराज आमच्या बरोबर पंढरपूरात होते.
यावरुन साऱ्यानांच कळुन आले की महाराज ही एक महान शक्ती आहे.
Leave a Reply