एकदा महाराजांच्या सौते गावातील स्त्री भक्तास नाग चावला. नाग चावताच त्या स्त्रीला त्यावेळच्या रितीरीवाजाप्रमाणे देवाच्या देवळात ठेवण्यात आले. महाराजांना ही बातमी कळताच महाराज तिकडे आपणाहून धावले आणि त्यांनी आपल्या गुरुच्या चरणाजवळचा अंगारा त्या स्त्रीच्या अंगावर नेऊन टाकला. बेशुद्ध पडलेली ती स्त्री पहाटेची शुद्धीवर आली. महाराजांना आनंद वाटला. महाराजांनी तिला आपल्या मठात चहा करुन देवळात जाऊन पाजला. तीस्त्री घरी निघून गेली पण जाताना महाराजांचे पाय पुजूनच गेली.
Leave a Reply