सौत गावात हुंबराचे झाड रस्त्यात आडवे पडले होते. झाडाचा बुंदा तीन – चार गडयांच्या कवळयात मावणार नाही येवढा मोठा होता. गावातील बऱ्याच लोकांनी. झाड बाजूला ढकलून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही. सारा प्रकार महाराजाच्या कानावर गेला. महाराज मठातून ताडकन उठले आणि त्या हुंबराच्या बुंध्याजवळ गेले. त्यांनी आपली प्रचंड ताकद पणाला लाऊन ते झाड रस्त्यातून बाजूला ढकलून लावले. रस्ता रिकामा झाला. त्या वाटंनं शिवारात जाणा-येणाऱ्यांची सोय झाली. सर्व गावकऱ्यांना आनंद झाला.
Leave a Reply