महाराज सावर्डे येथे गणपती पाटील यांच्या सपरात राहत असताना तेथे कोल्हापूरहून काही पैलवान आले होते. त्यांच्या बरोबर मोळवडयाचे किसन खोपडे हे पैलवान होते. महाराज या सर्वांना म्हणाले, “या सपराजवळाच्या बेटातला चीवा कोण उपडून दावणार बोला ?” महाराजांचे आव्हान लक्षात घेऊन काही पैलवानांनी तसा चीवा उपडण्याचा प्रयत्न केला. पण जमले नाही. महाराज आजारी अवस्थेत होते तरीही त्यांनी त्या पैलवानांनी दाखविलेला चीवा एका हिसक्यात उपडून दाखविला. सारे आश्चर्यचकित झाले.
Leave a Reply