एकदा एक भक्त आला आणि महाराजांना म्हणाला “मी तीर्थयात्रेला जाणार आहे तरी दिवस चांगला सांगा. तीर्थयात्रेला निघताना शुभवेळ बघावी असे म्हणतात.”
यावर महाराज म्हणाले, “अरे बाबा ! तुला पाहिजे तेव्हा जा. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. जन्मायला नि मरायला वेळ कोण बघतं काय? मग तीर्थ यात्रेसारखं पवित्र काम करण्यास निघाला असताना तुला वेळ काय करायची ? तुझ्या मनात आले आहे न्हवं मग लगेच त्या मार्गाला लाग बघू. शुभ कामाला प्रत्येक क्षण हा शुभच असतो. वेळ बघायची गरज नाही.”
Leave a Reply