संसारात राहून भक्‍ती करता येते

“एका संसारात गढून गेलेल्या स्त्री भक्ताने महाराजांना सांगितले की मला आठ मुले व दावणीला चार जनावरे आहे. त्यातून मला दर्शनासाठी येण्यास आठ-आठ दिवस सवड मिळत नाही.”

यावर महाराज म्हणाले, “तू संसारातुनही थोडासा वेळ परमार्थासाठी काढ. या सर्व व्यापासाठी तू बराच वेळ दररोज खर्च करतेस मग परमेश्वरासाठी थोडासा – खीनभर वेळ नाही का तुझ्याकडं मिळायचा?”

तु फक्त सकाळी आणि संध्याकाळी देवाचं नामस्मरण घरीच करीत जा. एवढे जरी केलेस तरी तुझ्या मानाने ते बरंच केल्यासारखे आहे. त्यासाठी खास मठात येण्याची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.