एकदा भगवी वस्त्रे धारण केलेला एक मनुष्य महाराजांच्या मठात आला. महाराजांना नमस्कार करुनम्हणाला,
“मी कोणी साधुपुरुष नाही. मी बायकापोरे पोसण्यासाठी अंगावर भगवी वस्त्रे धारण केली आहेत.”
महाराजम्हणाले, “त्यामुळे तुझा काय फायदा”
“माझ्या भगव्या कपडयांकडे बघून लोक माझ्या पाया पडतात. मला भिक्षा वाढतात. कोणी दक्षिणा देतात. या साऱ्यांचा उपयोग माझी बायकापोरे पोसण्यास होतो.”
यावर महाराज म्हणाले,
“ही भगवी वस्त्रे घालून तू लोकांना फसवितोस हे बरे कृत्य नाही. लोक अज्ञानात तुझ्या पाया पडतात. पण तू हे लक्षात घेतले नाहीस की भगव्या वस्त्रामुळे सर्वजण तुझ्या पाया पडतात. पण जे पाया पडतात ते पचविण्याची शक्ती तू कमविली नाहीस हे मोठं पाप केलं आहेस. याचं शासन तुला देव देईल. मी यापेक्षा अधिक काय बोलू ? बाहय ढंग करुन तू देवाशी वाकडे आणू नकोस हीच माझी इच्छा.”
Leave a Reply