साधनेसाठी एकांत हवा

एके दिवशी एक भक्‍त महाराजांच्या जवळ आला आणि म्हणाला, “महाराज साधना करण्याची माझी इच्छा आहे. पण ही साधना करण्यासाठी मी कोणत्या ठिकाणी जाऊ ?”

यावरती महाराज उत्तरले,“तुला कुठे वाटेल तिकडे जा. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घे. साधना करताना मन खंबीर ठेवून कर. ऋषिकेशला गेलास तर उत्तमच. आपलं मन एकाग्र ठेवून साधना केलीस तर मनाचा वढाळपणा निघून जाईल आणि नंतर तू कुठेही साधनेला बसलास तर ती तुला सहज करता येईल. मठाजवळ मी चाफा लावला तेव्हा त्याचे संगोपण करण्यासाठी मी त्याला काटेरी कुंपन घातले. त्यांची निगा केली. असं एक – दोन वर्षे केल्यानंतर तो चाफा चांगलाच वाढला. त्याचे जवळ जवळ झाडात रुपांतर झाले. तो चाफा हलू लागला, फुलू लागला. त्यानंतर त्याला कुंपनाची गरज ती काय ?”

साधना ही एकांतात करणे अत्यंत महत्त्वाचे असते. शेवटी मग तू साधना कोठेही कर, पण एकांत ही बाब महत्त्वाची असते. हे मात्र लक्षात घे.”

Leave a Reply

Your email address will not be published.